Template:Appeal/default/mr

From Donate
Revision as of 06:03, 18 November 2011 by imported>Amolkuber (Grammer)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search

Amolkuber 05:42, 18 November 2011 (UTC) गूगलजवळ एक लाखाच्या जवळपास सर्व्हर्स आहेत. याहूची कर्मचारीसंख्या अशीच काहीशी १३,००० च्या जवळपास आहे. विकिपीडियाजवळ फक्त ६७९ सर्व्हर्स असून कर्मचार्‍यांची संख्या ९५ आहे.

विकिपीडिया हे सध्या आंतरजालावर ५व्या क्रमांकाचे संकेतस्थळ आहे व दर महिन्यात ४२२ लक्ष लोकांना आपल्या करोडो पानांसह आपली सेवा पुरविते.

व्यापार चांगला आहे. जाहिरात करणे वाईट नाही. पण ते येथे असत नाही. विकिपीडियावर नाही.

विकिपीडिया काही खास आहे. ते वाचनालयागत किंवा खुल्या बगिच्यासारखे आहे. ते मनाच्या मंदिरासारखे आहे. ती अशी जागा आहे,जेथे आपण सर्व जाउन शिकु शकता, विचारमंथन करू शकता किंवा आपले ज्ञान इतरांसमवेत सहभागू शकता.

जेंव्हा मी विकिपीडियाची स्थापना केली,मी त्यास जाहिरातींच्या फलकांसह एक नफा कमाविणारी कंपनी करू शकलो असतो. पण मी काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. आपण सर्वांनी त्यास काटक व कडेकोट करण्यासाठी अथक काम केले. आपण आपले उद्दिष्ट्य साध्य केले व टाकावू गोष्टी इतरांसाठी बाकी ठेविल्या.

हे वाचणार्‍या सर्वांनी जर किमान २५०रु चे दान केले तर मदतनिधी जमवण्यासाठी आपल्यास वर्षातील फक्त एकच दिवस पुरेसा ठरेल. परंतू,सर्वांना ते शक्य नाही किंवा सर्व ते करणार नाही. हे ठिक आहे. प्रत्येक वर्षी बर्‍याच व्यक्ति दानाचा निर्णय घेतात.

या वर्षी,२५०रु, ५००रु, १०००रु, किंवा आपणास रुचेल ती रक्कम देण्याबाबत जरूर विचार करावा जेणेकरून विकिपीडिया बचावले व तरले जाईल.

धन्यवाद,

जिमी वेल्स
विकिपीडिया संस्थापक